Our Work | सेवेची वाटचाल

From child care to adoption, rehabilitation and education — every child at Adharashram receives love, care and the chance to thrive. We are recognised as a Child Care Institution (CCI) and a Specialised Adoption Agency (SAA) by the Government of India. We also run a working women’s hostel, physiotherapy and counselling centres for our children's well-being, and a computer lab for digital learning.

बालसंगोपन, दत्तकविधान, पुनर्वसन आणि शिक्षण – आधाराश्रमातील प्रत्येक बालकाला मिळते प्रेम, काळजी आणि स्वतःचे भवितव्य घडवण्याची संधी. महाराष्ट्र सरकारकडून मान्यताप्राप्त बालगृह (CCI) व भारत सरकारकडून मान्यताप्राप्त विशेष दत्तक संस्था (SAA) म्हणून कार्यरत. आमच्याकडे नोकरदार महिलांचे वसतिगृह, फिजिओथेरपी व समुपदेशन केंद्र, तसेच डिजिटल शिक्षणासाठी संगणक प्रयोगशाळा कार्यरत आहे.

Foundation | आधाराश्रमाची वाटचाल

Founded in 1954 by Ayurvedic doctor, Late Vaidya Annashastri Datar and his committed colleagues, Adharashram began with one small home and a big dream: to support children who have no one to turn to.

Today, with over 105 children in our nest every year and several generations of supporters, we continue to live by our founding value: every child deserves a home and a future.

कै. वैद्य अण्णाशास्त्री दातार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९५४ साली एका लहानशा घरातून या सेवायात्रेची सुरुवात केली. उद्देश्य एकच — ज्यांना कोणी नाही, त्यांच्यासाठी आधार व्हावे.

आज १०५ पेक्षा जास्त मुले, अनेक पिढ्यांचे सहकार्य आणि प्रत्येक मुलाला घर आणि भविष्य मिळावे, या मूल्याची सातत्याने जोपासना.

1 of 2

We invite you to visit Adharashram and our curious, bright-eyed children who are growing, learning, and dreaming every day. Your presence, stories, and time can bring joy and inspiration to their journey. Whether you want to celebrate a special occasion, share your skills, or simply spend time with the children, you are always welcome.

आधाराश्रमात जवळ जवळ १०५ अशी उमलती, जिज्ञासू बालके रहातात, जी शिक्षण घेण्यासाठी, स्वतःच्या पायावर उभे रहाण्यासाठी आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून जाण्यासाठी उत्सुक आहेत. तुम्ही गोष्टी सांगून, अभ्यास घेऊन, खेळ शिकवून, योग व व्यायाम शिकवून किंवा संस्कार वर्ग घेऊन त्यांचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी मदत करू शकता.

Our Kind-Hearted Pillars | आधाराश्रमाचे सहृदय आधारस्तंभ

It is financially difficult to manage this large family of around 105 children within the government grants. Adharashram volunteers try to connect with various social and industrial organisations to solicit their donations for this cause. The most notable among them are Mahindra&Mahindra Co-op. Society and Mylan, but it is the kind hearted generosity of individual donors which has always helped Adharashram in accepting new challenges. One touching example is Late Baloba Bhalekar, a street side peanut vendor, who donated ₹1 Lakh from his hard earned money to us, which we will never forget. We are eternally grateful to all the well wishers and donors, without whom we couldn’t have come so far for our cause.

आधाराश्रमाचे हे १०५ मुलांचे कुटुंब फक्त सरकारी अनुदानातून सांभाळणे आर्थिकदृष्ट्या अवघड आहे. म्हणून आश्रमाचे कार्यकर्ते देणग्यांसाठी विविध औद्योगिक आणि सामाजिक संस्थांच्या संपर्कात असतात. त्यापैकी महिंद्र अँड महिंद्र कोऑप सोसायटी आणि मायलॅन या विशेष उल्लेखनीय आहेत. परंतु वैयक्तिक देणगीदारांच्या विलक्षण औदार्या मुळेच आधाराश्रम आज नवनवीन आव्हाने स्वीकारण्यास सक्षम आहे.

याचे एक हृदयस्पर्शी उदाहरण म्हणजे रस्त्यावर चणे फुटाणे विकणारे कै.बाळोबा भालेकर, ज्यांनी आपल्या कष्टाच्या कमाईतून आधाराश्रमाला ₹1 लाख देणगी देऊन आम्हाला नतमस्तक केले. आम्ही सर्व हितचिंतक आणि देणगीदारांचे सदैव ऋणी आहोत, कारण केवळ त्यांच्यामुळे आम्ही आज आपल्या ध्येयमार्गावर वाटचाल करत आहोत.